चार हजार मतदारांचे रंगित छायाचित्रच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:14+5:302021-02-23T05:01:14+5:30
वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम तालुक्यातील एकूण १४८ मतदान केंद्रांच्या मतदार याद्यांमध्ये जवळपास चार हजार मतदारांचे रंगीत छायाचित्र नाही. ...
वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम तालुक्यातील एकूण १४८ मतदान केंद्रांच्या मतदार याद्यांमध्ये जवळपास चार हजार मतदारांचे रंगीत छायाचित्र नाही. मतदारांचे रंगीत छायाचित्र संकलित करून संगणकीयप्रणालीव्दारे अपलोड करण्याबाबत निर्देश दिलेले असून त्याअनुषंगाने सर्व संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाºयांनी रंगीत छायाचित्र संकलित करून वाशिम तहसिल कार्यालयात जमा करण्याच्या सूचना तहसिलदार विजय साळवे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित भागाच्या बी.एल.ओ. यांनी संबंधित मतदार हे नमुद पत्त्यावर राहत नसल्याचे कळविले आहे. संबंधित मतदारांची पडताळणी करून त्यांचे रंगीत छायचित्र संकलित करण्याकरीता छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी तहसिल, नगर परिषद, पंचायत समिती, मंडळ अधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आली. या यादीत नाव असलेल्या मतदारांनी सात दिवसात रंगीत छायाचित्र संबंधित बी.एल.ओ. किंवा तहसिल कार्यालयात जमा करावे अन्यथा पुढील कार्यवाही करण्याचा इशारा तहसिलदार साळवे यांनी दिला.