डॉक्टर दारीही नाही अन् गावातही नाही ..

By admin | Published: June 16, 2014 12:19 AM2014-06-16T00:19:47+5:302014-06-16T00:41:17+5:30

मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार?

There is no doctor, nor even in the village. | डॉक्टर दारीही नाही अन् गावातही नाही ..

डॉक्टर दारीही नाही अन् गावातही नाही ..

Next

रिसोड : ग्रामीण भागात गोरगरिबांना खासगी वैयक्तिक सेवा परवडत नाही. त्यामुळे शासनाने गरिबांना वेळीच उपचार मिळावे या हेतूने ह्यडॉक्टर आपला घरीह्ण ही अभिनव योजना सुरू केली होती. मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार? हा प्रश्न जनतेला पडत आहे. शासनाच्या वतीने बर्‍याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. छोट्या-छोट्या आजारांसाठी त्यांना खासगी डॉक्टरशिवाय पर्याय राहत नाही. तालुक्याचे ठिकाणी शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी तेवढा वेळ नसल्याने तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड व निष्काळजीपणामुळेही बर्‍याच रुग्णांची तेथे जाण्याची मानसिकता होत नाही. शिवाय आवश्यक औषधीही येथे मिळत नाही. त्यामुळे शासकीय सुविधेवरचा लोकांचा विश्‍वास कमी होत चालला असून, गावामध्येही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच खासगी डॉक्टरांचे दर त्यांना परवडणारे नसले तरीही त्यांना काहीही करून वेळप्रसंगी घर, दागिने विकून डॉक्टरांची भरपाई करावी लागते. डॉक्टरांच्या खर्चात दाद मागण्याची काहीही मुभा नसल्याने त्यांना निमूटपणे हा खर्च सहन करावा लागतो; अन्यथा रुग्णाला मृत्यूची वाट मोकळी करून द्यावी लागते. परिसरातील बर्‍याच खेड्यांमध्ये सरकारी डॉक्टरचे दर्शनच होत नाही. महिलांना प्रसूती कामासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, प्रशासनाचा डॉक्टर आपल्या दारी या योजनेचे तीन-तेरा वाजले असून, संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या; त्यांचा आर्थिक ताण कमी करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Web Title: There is no doctor, nor even in the village.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.