जिल्ह्यातील ६५५ शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन एज्युकेशन सुरू कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:24+5:302021-07-09T04:26:24+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन वर्गाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मार्गाने शिक्षण देण्याची ...
कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन वर्गाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मार्गाने शिक्षण देण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ज्या गावांत इंटरनेट सुविधा नाही, तेथे सरकारने तत्काळ पोहोचायला हवे. तेथील मुलांच्या भवितव्यासाठी प्राधान्याने इंटरनेट सुविधा पोहोचवायला हवी; परंतु जिल्ह्यात १४१९ शाळांपैकी ६५५ शाळांत इंटरनेटच नसल्याचे शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेता ऑफलाइन शिक्षण बंद ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गच सुरू आहेत. शिक्षकांना स्वत:च्या मोबाईलवरून ऑनलाइन क्लासेस घ्यावे लागत आहेत. मोबाईल डेटासाठी शिक्षकांचे पैसे खर्च होत असून, सरकारने मोबाईल इंटरनेटचा खर्च द्यावा, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
१) ग्राफ
- इंटरनेट असलेल्या - १५८
- इंटरनेट नसलेल्या - ६५५
जिल्ह्यातील एकूण शाळा - १४२२
शासकीय शाळा - ८१३
अनुदानित शाळा - १८४
विनाअनुदानित शाळा - ४२२
२) शिक्षकांना मोबाईलचा आधार (ज्या शाळांमध्ये इंटरनेट नाही, अशा शाळेतील दोन शिक्षकांच्या प्रतिक्रिया)
१) कोट : ग्रामपंचायतींच्या माध्यमांतून शाळांत इंटरनेट कनेक्शन जोडणीसाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, सद्य:स्थितीत आम्ही मोबाईलच्या आधारेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देत आहोत.
- राजेश मोखडकर, शिक्षक
--------------
२) कोट : ग्रामपंचायतींच्या माध्यमांतून शाळांत इंटरनेट कनेक्शन जोडणी देण्यात येणार आहे. परंतु, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने मोबाईलच्या आधारेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे आम्ही देत आहोत.
- एन. एम. काळे, शिक्षक
--------------
३) ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ (ग्रामीण भागातील कुठल्याही एका छोट्याशा गावातील दोन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया).
१) कोट : गतवर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यंदाही शाळा सुरू झाल्या नाहीत. शाळेतील शिक्षक घरोघरी भेटी देऊन चार ते पाच विद्यार्थ्यांच्या गटाला शिक्षणाचे धडे देतात. आम्हाला ऑनलाइन शिक्षणाची फारशी माहिती नाही.
-गजानन काळेकर, विद्यार्थी
------------------
२) कोट : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे. परंतु, आमच्या गावात इंटरनेट सुरळीत चालत नाही. त्यामुळे शिक्षक घरोघरी भेटी देऊन चार ते पाच विद्यार्थ्यांच्या गटाला शिक्षणाचे धडे देतात. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा आधार नाही.
-विकास आरेकर, विद्यार्थी
---------------
४) शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट
१) कोट : प्रत्येक ग्रामपंचायत फायबर ऑप्टिकलशी जोडण्यात आलेल्या असून, गावांतील शाळांना ग्रामपंचायतींनीच ई-सेवा सुविधेतून इंटरनेट जोडणी द्यावयाची आहे. संबंधित शाळा व संस्थांना या जोडणीनंतर इंटरनेट खर्च करावा लागणार आहे. जिल्ह्यातील ६५५ शासकीय शाळांत इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली नाही.
-गजाननराव डाबेराव
प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि. प. वाशिम
-------