ठाण्यात पार्किंग नाही; इथे कोण फाडणार पावती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:32+5:302021-03-06T04:39:32+5:30
वाशिममध्ये बसस्थानकानजीक शहर व जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात ग्रामीण पोलीस ठाणे वसलेले आहे. यासह जिल्हा क्रीडा संकुलानजीक शहर ...
वाशिममध्ये बसस्थानकानजीक शहर व जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात ग्रामीण पोलीस ठाणे वसलेले आहे. यासह जिल्हा क्रीडा संकुलानजीक शहर व जिल्हा वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शहर व जिल्ह्यातील वाहतुकीचे नियमन केले जाते. मुख्य चौकांमध्ये, बाजारपेठेत व अन्य ठिकाणच्या रस्त्यावर दिवसभर गस्त घालून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामुळे अनेकवेळा वादाच्या घटनाही घडतात. मात्र, ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात पार्किंगची नाही. त्यामुळे मग पोलिसांनाही दंड का लावला जाऊ नये, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
...................
०२
शहरातील पोलीस ठाणे
४०
पोलीस कर्मचारी
..............
पोलिसांची शासकीय वाहने
४०
दुचाकी
०३
चारचाकी
......................
सर्वसामान्यांना लाखोंचा दंड; मग पोलिसांना का नाही?
१) सर्वसामान्य नागरिक जर वाहतूक नियमाचे पालन करीत नसतील तर त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करण्यासाठी पोलीस थोडीही कुचराई करीत नाहीत. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारून दंड वसूल केला जातो.
२) रस्त्याने धावणाऱ्या वाहनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास मोबाइलमध्ये फोटो काढून ‘फाइन’ भरण्याचा ‘मेमो’ पाठविला जातो. या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल होतो. मात्र, पोलीसच जर नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्यांच्याकडूनही दंड का वसूल केला जाऊ नये, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
.................
कोट :
वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचा परिसर तुलनेने मोठा आहे. मात्र, ही इमारत स्वत:ची नाही. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था अद्यापपर्यंत उभारण्यात आलेली नाही. असे असले तरी ‘नो पार्किंग’चा फलक लावून अंमलबजावणी करण्यात येईल.
- विनोद झळके
ठाणेदार, ग्रामीण पोलीस ठाणे, वाशिम