पश्चिम वऱ्हाडात दोन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:23 PM2018-01-01T14:23:31+5:302018-01-01T14:26:58+5:30
वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते.
वाशिम: पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असण्यासोबतच इतर कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी दरवर्षी अशा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणही केले जाते. मात्र, अलिकडच्या काळात नियमित सर्वेक्षण नसल्याने झोपडपट्टी व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासूच दूरच राहत असल्याचे दिसून येते. शिक्षण विभागाकडून पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात ४ जुलै २०१५ रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १११३ मुले शाळाबाह्य आढळली होती. त्यांना रितसर प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशही देण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून आजतागायत हे सर्वेक्षण झालेले नाही.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, तो नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षण विभाग तसेच प्रशासनाच्या सर्व विभागांच्या वतीने ४ जुलै २०१५ रोजी शाळाबाह्य मुलांचे एकदिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी १११३ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. मात्र, तेव्हापासून या सर्वेक्षणास सपशेल ‘कोलदांडा’ देण्यात आला. जेव्हा की, आजही इमारत बांधकामस्थळी तथा शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये पाल मांडून वास्तव्य करणाºया कुटूंबांसह शेतमळे आणि जंगलात वास्तव्य करणाºया कुटूंबातील अनेक मुले शाळा आणि शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने पुन्हा एकवेळ शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी सुज्ज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार २ वर्षांपूर्वी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून मात्र ही मोहिम राबविण्यात आलेली नाही. असे असले तरी आगामी जुन महिन्यापासून पुन्हा एकवेळ मोहिम राबवून शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल.
- अंबादास मानकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., वाशिम