वाशिम येथील वीज कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:23 PM2019-06-11T14:23:41+5:302019-06-11T14:24:10+5:30
वाशिम : वीज कर्मचाºयांचे निलंबन मागे घ्यावे व इतर दोन कर्मचाºयांवरील बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने ८ जूनपासून पुकारलेले साखळी उपोषण ११ जून रोजीदेखील सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महावितरणमधील मागासवर्गीय कर्मचाºयांना विनाकारण मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप करीत निलंबित तसेच बडतर्फ केलेल्या कर्मचाºयांवरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने महावितरणच्या विद्युत भवन या मुख्य कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. १० जून रोजी संघटनेचे केंद्रीय संघटक एस. के. हनवते, अकोला परिमंडळ अध्यक्ष एस. एस. गवई तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला येथून संघटनेचे पदाधिकारी वाशिम येथे साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते. प्रशासनाशी झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यामुळे संघटनेने साखळी उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ जून रोजीदेखील साखळी उपोषण सुरूच आहे. अन्यायकारक निलंबन करण्याºया अधिकाºयांविरूद्ध ठोस कारवाई करावी अशी मागणी वाशिम मंडळ अध्यक्ष एस. सी. भगत, मंडळ सचिव संतोष इंगोले यांच्यासह पदाधिकाºयांनी केली.