वाशिममध्ये झालीच नाही एनसीसी बटालियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:37+5:302021-08-24T04:45:37+5:30
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एनसीसीमध्ये दाखल आहेत. या माध्यमातून ‘एनडीए’ची परीक्षा देऊन सैन्यदलात दाखल होण्याची संधी मिळू शकते; ...
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एनसीसीमध्ये दाखल आहेत. या माध्यमातून ‘एनडीए’ची परीक्षा देऊन सैन्यदलात दाखल होण्याची संधी मिळू शकते; मात्र त्यासाठी योग्यप्रकारे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. हा उद्देश समोर ठेवून वाशिममध्ये एनसीसी बटालियनला अनेक वर्षांपूर्वी मंजुरीदेखील मिळाली; मात्र पर्याप्त जागेसह अन्य सुविधांअभावी हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. २०१९ मध्ये शासनाकडे सलग पाठपुरावा करून तथा वाशिम-रिसोड रस्त्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विनावापर पडून असलेल्या जागेस मंजुरी मिळवून तिथे एनसीसी बटालियन सुरू करण्यास तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी मिळविली. नव्या वर्षात आर्मीची विशेष चमू वाशिममध्ये दाखल होऊन जिल्ह्यातील तीन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार होती; मात्र त्यानंतर कोरोनाचे संकट उद्भवल्याने आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
...................
कोट :
एनसीसी बटालियनकरिता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची काही जागा मंजूर करून देण्यात आलेली आहे. २०२० मध्ये त्याठिकाणी आर्मीची विशेष चमू दाखल होऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार होती; मात्र त्यानंतर कोरोना संकटामुळे ते शक्य झाले नाही. त्याचे नव्याने नियोजन केले जाईल.
- शन्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम