अकोला नाका परिसरातील अतिक्रमण जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 04:59 PM2019-05-27T16:59:14+5:302019-05-27T16:59:20+5:30
वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरच काही जण आॅटो , खासगी वाहने उभी करत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करुनही अतिक्रमण जैसे थे च दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.
वाशिम ते अकोला रस्त्यावर मोठया प्रमाणात जडवाहने धावतात. तसेच या भागातच जास्तीत जास्त लक्झरी बसेस थांबत असल्याने येथे नेहमीच वर्दळ राहते. भर रस्त्यावर वाहने उभी केल्या जात असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
या रस्त्याच्या आजुबाजुला हॉटेल, चहा टपरी व पानठेल्यावाल्यांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे पुढून येणाारे वाहन लक्षात येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
अकोला नाक्याजवळ भव्य असे नगपरिषदेचे भव्य संकुल उभारण्यात आल्याने येथे व्यापाºयांची प्रतिष्ठाने दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. यामुळे येथे मोठया प्रमाणात नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे. वाढती रहदारी पाहता व झालेल्या अतिक्रमणामुळे वाढलेले अपघात टाळण्यासाठी या परिसरातील अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.