सहाशे हेक्टर क्षेत्रावर सिंचन करणाºया प्रकल्पातील अडथळा होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:39 PM2017-10-15T14:39:34+5:302017-10-15T14:42:04+5:30
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यात शिरपूर जैनपासून २ किलोमीटर अंतरावर मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यात शिरपूर जैनपासून २ किलोमीटर अंतरावर मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी परिसरातील पांगरखेडा-चांडस रस्त्यावर पुलाची उभारणी करणे आवश्यक असताना यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सर्व अडचणी दूर होऊन आता प्रत्यक्ष या रस्त्यावरील पुलाचे कामच अंतिम टप्प्यात आल्याने मिर्झापूर प्रकल्पाच्या उभारणीतील मोठा अडथळा दूर होणार आहे. वाशिम जिल्ह्यात गतकाही वर्षांपासून मंजूर झालेले; परंतु तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेले बरेच प्रकल्प आहेत. त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे शिरपूर जैन परिसरातील तब्बल ६१० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते. या प्रकल्पासाठी शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आणि कामही सुरू झाले; परंतु या प्रकल्पाच्या उभारणीनंतर परिसरातील चांडस-पांगर खेडा रस्ता नदीच्या प्रवाहामुळे बंद पडणार होता. यासाठी या रस्त्यावर नव्याने उंच पूल उभारणे गरजेचे होते. याच कारणामुळे मिर्झापूर प्रकल्पाची घळभरणीही थांबली होती. आता या पुलाच्या कामास गतवर्षी मंजुरी मिळाल्यानंतर हे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या महिना, दीड महिन्यातच ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामाचा मार्गही मोकळा होईल आणि पुढील वर्षीपासून शेतकºयांना या प्रकल्पातील पाण्यावर सिंचन करता येईल, तसेच परिसरातील पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागू शकणार आहे.