इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार; शिक्षकांच्या केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:27+5:302021-07-11T04:27:27+5:30

संतोष वानखडे वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. मात्र, यामध्ये शिक्षकांचा समावेश ...

There will be other staff transfers; When teachers? | इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार; शिक्षकांच्या केव्हा?

इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार; शिक्षकांच्या केव्हा?

Next

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. मात्र, यामध्ये शिक्षकांचा समावेश नसल्याने, बदल्या केव्हा होणार? असा प्रश्न शिक्षक संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर शासनाच्या भूमिकेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. अखेर ९ जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठविली आहे. या आदेशानुसार ३१ जुलैपर्यंत १५ टक्क्यांपर्यंत सर्वसाधारण बदल्या आणि १४ ऑगस्टपर्यंत १० टक्के विनंती बदल्या होणार आहेत. यामध्ये शिक्षकांच्या बदल्यांचा कुठेही उल्लेख नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग सुकर झाला, मग आमच्या बदल्या केव्हा? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.

००००००

एकूण जि.प. शिक्षक : ३५००

बदलीस पात्र शिक्षक : ३००

०००००००००००००

बॉक्स

आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येऊ शकतात १५ ते २० शिक्षक

बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्यास जिल्ह्यात शिक्षकांची फारशी पदे रिक्त नसल्याने आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य राहणार आहे; साखळी पद्धतीने बदल्या झाल्यास आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात १५ ते २० शिक्षक येऊ शकतात आणि जिल्ह्यातील १५ ते २० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.

००००

कोट

इतर शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातदेखील आदेश निघणे अपेक्षित आहे. शिक्षकांच्या बदल्यांवरील बंदी अद्याप उठली नसल्याने हा शिक्षकांवर एक प्रकारे अन्यायच आहे.

- विजय मनवर, शिक्षक

\\\\\\\\\\

राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठविली आहे. मात्र, त्याचबरोबर शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती कायम ठेवण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

- सतीश सांगळे, शिक्षक

०००

Web Title: There will be other staff transfers; When teachers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.