ते कच-यात शोधतात 'भाकरी’ !
By admin | Published: August 17, 2016 12:33 PM2016-08-17T12:33:58+5:302016-08-17T15:05:20+5:30
प्रत्येक कुटूंब आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील टाकाऊ कचरा उकिरड्यावर फेकतात, परंतु समाजातील एक घटक असाही आहे, की तो याच कच-यात आपली ‘भाकर’ शोधत असतो.
Next
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. १७ - प्रत्येक कुटूंब आपले घर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने घरात जमा झालेला टाकाऊ कचरा आणि घाण उकिरडयावर फेकतात. त्यांच्या ठायी या कच-याची काहीच किंमत नसते; परंतु समाजातील एक घटक असाही आहे, की तो याच कच-यात आपली ‘भाकर’ शोधत असतो. ही गमतीची किंवा आश्चर्याची बाब नव्हे, तर समाजातील अतिशय विदारक आणि विषमतेची प्रचिती देणारे वास्तव आहे. या विदारकतेचा प्रत्यय वाशिम शहरात येत आहे.
नगर परिषदेच्या घंटागाड्या शहरातील विविध ठिकाणचा कचरा गोळा करून पुसद मार्गानजिक असलेल्या खुल्या जागेत टाकतात. या कचºयाकडे सुज्ञ किंवा समजदार माणूस पाहणार सुद्धा नाही; परंतु हा अगदी चुकीचा समज आहे. नगर परिषदेच्या घंटागाड्या येथे कचरा टाकण्यासाठी येतात. त्यावेळी समाजाच्या उपेक्षीत आणि अत्यंत दारिद्रयात जीवन कंठणा-या कुटुंबातील मोठी माणसे नव्हे, तर अल्पवयीन बालके या घंटागाड्याच्या मागे धावत जातात. जवळपास ८ ते १० मुले, मुलींचा हा घोळका या कच-याच्या गाडीवर अक्षरश: तुटून पडतो. कचरा गाडीतून खाली पडायच्या आधीच त्या कचºयातून आपल्यासाठी उपयुक्त असे काही शोधण्यास सुरुवात करतात. आता ही मुले कच-यात शोधतात तरी, काय हा प्रश्न सर्वांना पडणे साहजिक आहे, कारण कच-यातून जिवजंतूमुळे संसर्ग होऊन आजार होण्याची आणि शरीरावर घाणच साचू शकते. मग हे माहित असतानाही ही मुले त्याची पर्वा न करता कच-यातील विविध वस्तू उचलतात. यामध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर भंगार ते शोधून आणि त्याची विक्री करून दिवसाच्या जेवणाची सोय लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न. दूरून हे दृष्य पाहणा-यांना कदाचित किळस येत असेल; परंतु हे त्यांचे जीवन बनले आहे. एकिकडे स्वत:च्या अय्याशीसाठी भ्रष्टाचार करणारे अधिकारी, कर्मचारी आणि चोरी, दरोडे टाकून निष्पापांची मालमत्ता बळकावणारे लोक जगात उजळ माथ्याने जगतात. कुठलाही समाज चोरी किंवा भ्रष्टाचाराला मान्यता देत नसतानाही आपल्या कूकृत्यांचे समर्थन करून उजळ माथ्याने जगतात. विचार करायचा झाला, तर आईवडिलांची दयनीय परिस्थिती लक्षात घेत स्वाभिमान जीवंत ठेवून आणि कुठलेही गैरकृत्य न करता घाणीतून आपली भाकर शोधणाºया या चिमुकल्यांची सर्वांनाच दया यायला हवी; परंतु समाज मात्र भ्रष्टाचार आणि चोºया करून बंगल्यात राहणा-यांना सन्मान देतो आणि अतिशय निरूपद्रवी असलेल्या आणि घाणीतच जगणा-या समाजाकडे मात्र तुच्छ नजरेने पाहतो. हे कटू सत्य अनाकलनीय आहे.