अल्पवयीन मुलीकडून जप्त केला चोरीचा मुद्देमाल!
By admin | Published: January 7, 2017 06:21 PM2017-01-07T18:21:08+5:302017-01-07T18:21:08+5:30
घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह १.४२ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीप्रकरणी वाशिम पोलिसांनी अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ - घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह १.४२ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीप्रकरणी वाशिम पोलिसांनी ७ जानेवारीला एका अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले असून तिच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते २ जानेवारीला रात्रीच्या सुमारास स्थानिक दत्तनगर लाखाळा परिसरात वास्तव्यास असलेले सागर दौलतराव वायचाळ यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे लॉकेट, अंगठी, कानातल्या रिंग यासह ७४ हजार रुपये रोख रक्कम लंपास झाली. यासंदर्भात वायचाळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चमूने तीनच दिवसांत या चोरीचा छडा लावत एका अल्पवयीन मुलीस अटक केली असून तिच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.