ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिस-या दिवशी ९७ उमेदवारी अर्ज
By admin | Published: July 16, 2015 01:28 AM2015-07-16T01:28:27+5:302015-07-16T01:28:27+5:30
तीन दिवसांत एकूण १२८ नामांकन दाखल.
वाशिम : ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसर्या दिवशी ९७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तीन दिवसांत एकूण १२८ नामांकन दाखल झाले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जुनला जाहीर केलेला आहे. वाशिम जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान होणार असून, ६ ऑगस्टला मतमोजणी होईल. मालेगाव तालुक्यातून एकाही उमेदवाराने तिसर्या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल केले नाही. तिसर्या दिवशी रिसोड तालुक्यात मोप तीन, कंकरवाडी दोन, देऊळगाव बंडा एक, करंजी सहा, करडा चार, शेलु खडसे एक, खडकी सदार एक असे एकूण १८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मानोरा तालुक्यात १५ जुलै रोजी ३१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये गादेगाव ३, धामणी १, अजनी ७, वाईगौळ ९, शेंदूरजना (अ) ३ व आमकिन्ही १ असे एकूण ३१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस. मुडा यांनी दिली. कारंजा तालुक्यात तिसर्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. मंगरुळपीर तालुक्यात ३४ अर्ज दाखल झाले. यामध्ये चांभई १, फाळेगाव २, नांदखेडा ३, पार्डीताड ५, ईचा १, शेलूबाजार २, भूर १, चोरद १, लावणा ८, खडी १, कवठळ ९ अशी अर्जांचा समावेश आहे. तिसर्या दिवशी वाशिम तालुक्यातून १४ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये कळंबा महाली तीन, टो व पंचाळा प्रत्येकी एक, अनसिंग नऊ अशा १४ अर्जांचा समावेश आहे. नामांकन अर्ज सादर करण्याच्या दुसर्या दिवसापर्यंत एकूण ३१ अर्ज दाखल झाले होते. तिसर्या दिवशी ९७ अर्ज आल्याने एकूण १२८ नामांकन दाखल झालेत.