मंगरुळपीर तालुका जिल्ह्यात तिसरा

By Admin | Published: June 14, 2017 02:40 AM2017-06-14T02:40:02+5:302017-06-14T02:40:02+5:30

मंगरुळपीर तालुक्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला.तालुक्यातील ४३ शाळांमधील एकूण २,८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Third in Mangaralpir taluka district | मंगरुळपीर तालुका जिल्ह्यात तिसरा

मंगरुळपीर तालुका जिल्ह्यात तिसरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ जून रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये मंगरुळपीर तालुक्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला.
तालुक्यातील ४३ शाळांमधील एकूण २,८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यातील शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे एन बी. शेळके विद्यालय कुंभी ८३.१६, कलंदरिया उर्दू हायस्कूल मंगरुळपीर ९२.६८ टक्के, सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर ७७.२२, अविनाश विद्यालय मंगरुळपीर ६६.००, जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळपीर ८३.२७, नाथ विद्यालय मंगरुळपीर १०० टक्के, मातोश्री पार्वतीबाई कन्या शाळा मंगरुळपीर ८४.२१, महात्मा जोतिबा फुले विद्यालय कोठारी ९४.२८, कानिफनाथ महाराज विद्यालय सावरगाव (कान्होबा) ८८.००, ब्रह्मानंद गिरी विद्यालय मोहरी ८९.३४, बैरागी बाबा विद्यालय धोत्रा १०० टक्के, पी.जी. गावंडे विद्यालय पारवा ९६.६१, श्री शिवाजी विद्यालय वनोजा ७८.७५ टक्के , गोविंद विद्यालय पार्डी ताड ७६.११, जयकिसन विद्यालय फाळेगाव (व्यवहारे) ८७.२७, धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा खुर्द ९४.१६, मौलाना अ. क़ आझाद उर्दू हायस्कूल आसेगाव ८३.३७, संत गाडगे महाराज विद्यालय आसेगाव ८३.८७, लक्ष्मीचंद हायस्कूल शेलूबाजार ९७.१४, भायजी महाराज विद्यालय तऱ्हाळा ९७.६७, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय गोगरी ८४.०९, भगवंत महाकाळ विद्यालय मानोली ८२.५३, मालतीबाई अफजलपूरकर विद्यालय सोनखास ६६.६६, मोतीरामजी चंद्रभानजी ठाकरे विद्यालय कासोळा ९३.०६, गजाधर राठोड विद्यालय शेगी ५८.८२, वसंतराव नाईक आश्रमशाळा चेहेल ७१.१५, बबनराव इंगोले विद्यालय कंझरा ६९.०४, प्रा. जावेद खान उदर््ू हायस्कूल मंगरुळपीर १०० टक्के, यशवंतराव चव्हाण विद्यालय मंगरुळपीर ९८.५२, उर्दू माध्यमिक विद्यालय शेलूबाजार ९७.६१, अमान उर्दू हायस्कूल मंगरुळपीर ९२.५०, त्रिनेत्री बहु. विद्यालय पेडगाव ९०.००, परमहंस झोलेबाबा विद्यालय पिंप्री बु. ९५.८३, जनता हायस्कूल कवठळ ७८.९४, केंद्रीय मागासवर्गीय माध्यमिक आश्रम शाळा मंगरुळपीर २१.०५, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल मंगरुळपीर १०० टक्के, स्व. गंगारामजी काळे विद्यालय दाभा ९७.७७, भायजी महाराज विद्यालय पिंपळखुटा संगम ९४.८७, छत्रपती शिवाजी विद्यालय शेंदूरजना (मोरे) ८१.२५, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शेलूबाजार १०० टक्के, अवस उर्दूृ हायस्कूल शेलूबाजार ८७.१७, शासकीय मागासवर्गीय मुलांचे विद्यालय १०० टक्के, महात्मा जोतिबा फुले विद्यालय सोनखास ७९.४१ टक्के, असे निकाल लागले आहेत.

Web Title: Third in Mangaralpir taluka district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.