तहानलेल्या पक्ष्यांना गळत्या व्हॉल्व्हचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 04:15 PM2018-05-29T16:15:56+5:302018-05-29T16:15:56+5:30
मंगरुळपीर: जिल्ह्यातील ९० टक्के जलस्त्रोत आटल्याने पाण्याअभावी पशू, पक्ष्यांचा जीव संकटात सापडला असताना पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या व्हॉल्वमधून पडणारे पाणी चोचीने टिपून पक्षी तहान भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गतवर्षीच्या अवर्षणामुळे यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी मानवासह पशू, पक्ष्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यातच जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले असून, वन्यपशू आणि पक्ष्यांचा जीवच पाण्याअभावी संकटात सापडला आहेत. अनेक पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. लोकवस्तीतही पाण्याचे स्त्रोत नसल्याने पक्ष्यांचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. अशात पाणी पुरवठा योजनांच्या गळत्या व्हॉल्वचा पशू आणि पक्ष्यांना चांगलाच आधार होत असल्याचे चित्रही पाहायला मिळतेय. व्हॉल्वमधून गळणारे पाणी खाली साचल्यानंतर पशू त्यावर तहान भागवित आहेत, तर याच व्हॉल्वमधून गळणारे पाणी चोचिने टिपून आपली तहान पक्षी भागवित आहेत.