तेरा वर्षीय आनंदी भाजी विकून करते कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:14+5:302021-07-26T04:37:14+5:30

गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रात झळ पोहोचून अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सर्वसामान्य नागरिक, मजूर, कामगार व लघु ...

Thirteen-year-old Anandi sells vegetables to help the family | तेरा वर्षीय आनंदी भाजी विकून करते कुटुंबाला मदत

तेरा वर्षीय आनंदी भाजी विकून करते कुटुंबाला मदत

Next

गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रात झळ पोहोचून अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सर्वसामान्य नागरिक, मजूर, कामगार व लघु व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांनी मिळेल ते काम करणे सुरू केले आहे. असेच एक उदाहरण शहरात पाहायला मिळत आहे. येथील बाजारात याच विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेली आनंदी गोतरकर ही मुलगी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आभासी पद्धतीने शिक्षण घेऊन त्यानंतर दररोज बाजारात निंबू, सांबार विकून आपल्या कुटुंबाला मदत करून खारीचा वाटा उचलत आहे. शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला मदत करण्याची धडपड इतर मुलांसाठी आदर्श ठरणारीच आहे.

-----------

शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष

आनंदी गोतरकर ही मुलगी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी भाजीबाजारात निंबू, सांभार विकत असली तरी शिक्षणाकडे मात्र तिचे मुळीच दुर्लक्ष झालेले नाही. शिक्षण घेण्याची तिची जिद्द कायम असून, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे घेतल्यानंतरच ती भाजीबाजारात निंब, सांभार विकण्याचे काम करताना दिसते.

Web Title: Thirteen-year-old Anandi sells vegetables to help the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.