पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:24+5:302021-01-24T04:20:24+5:30
................. घोटाळाप्रकरणी कागदपत्रांची पाहणी वाशिम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कंपन्यांना औषधपुरवठा करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण जानेवारी, ...
.................
घोटाळाप्रकरणी कागदपत्रांची पाहणी
वाशिम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कंपन्यांना औषधपुरवठा करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण जानेवारी, २०२० मध्ये येथे घडले होते. या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून प्राप्त कागदपत्रांची पोलिसांकडून पाहणी सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले.
..............
शाळा बंदमुळे ऑटोचालक अडचणीत
वाशिम : केजी-१ ते आठवीपर्यंतच्या शाळा अद्याप बंद आहेत. २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू होणार, पण किती मुले शाळेत येतील, यावर प्रश्नचिन्ह आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणारे ऑटोचालक पुरते अडचणीत सापडले आहेत.
.................
कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजारांवर
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधित झालेल्यांचा एकूण आकडा प्रथमच ७ हजारांवर पोहोचला आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
............
शूटिंग बॉल स्पर्धेला प्रतिसाद
वाशिम : जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनतर्फे सवड (ता.रिसोड) येथे २३ जानेवारीला जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली. त्यास खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे अजिंक्य शूटिंग बॉल असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.
..............
महत्त्वाची पदे रिक्त; कामकाज प्रभावित
वाशिम : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सहायक वाहन निरीक्षकांची १४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील केवळ ५ भरण्यात आली असून, हे कर्मचारीही प्रशिक्षण कार्यात गुंतत असल्याने कामकाज प्रभावित होत आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.
..........................
वृक्षलागवड, संवर्धनासंबंधी ग्रामस्थांना मार्गदर्शन
मेडशी : समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत गावोगावच्या ग्रामस्थांना सध्या ऑनलाइन प्रशिक्षण देणे सुरू आहे. गुरुवारी येथे झालेल्या कार्यक्रमात गावकऱ्यांना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.