वाशिम तालुक्यात महिनाभरात हजारांवर गुरांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 02:55 PM2019-01-13T14:55:01+5:302019-01-13T14:56:01+5:30

वाशिम: जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाण्याची पातळी खालावत असतानाच गुरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर झाल्याने अडचणीत आलेले पशूपालक गुरांची विक्री करीत आहेत.

thousands of cattle Sales in a month in Washim taluka | वाशिम तालुक्यात महिनाभरात हजारांवर गुरांची विक्री

वाशिम तालुक्यात महिनाभरात हजारांवर गुरांची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाण्याची पातळी खालावत असतानाच गुरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर झाल्याने अडचणीत आलेले पशूपालक गुरांची विक्री करीत आहेत. यामुळे वाशिम तालुक्यात गेल्या महिनाभरातच तब्बल १०२३ गुरांची विक्री झाल्याचे बाजार समितीमधील गुरे बाजारातील आकडेवारीवरून कळले आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसत असले तरी, वाशिम तालुक्याचा भूस्तर आणि पावसाची अनियमिता. यामुळे त्याचा फारसा फायदा होत नाही. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांत ३० टक्के जलसाठाही उरला नाही. तर गुरांच्या पाण्यासाठी आधार ठरणारे अनेक तलाव कोरडे पडले आहेत. त्यातच चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात पशूचाºयाचा प्रश्न गंभीर होत असल्यानेच जिल्हाधिकाºयांनी चारा जिल्ह्याबाहेर नेण्यावर बंदीही घातली आहे. तथापि, हिरवा चारा पावसाळा अखेरच संपला, तर इतर चाºयाची उपलब्धता फारशी नाही. त्यातच ढेप, सरकी आदि पशूखाद्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पशूपालक अडचणीत आले असून, त्यांनी जनावरे विकण्याचीच तयारी केली आहे. वाशिम येथील गुरांच्या बाजारात गेल्या महिनाभरात १०२३ गुरांची विक्री झाली. यात म्हशींची संख्या सर्वाधिक ६४९, बैलांची संख्या १९५ असून, शेळ्या, गाईंचीही विक्री पशूपालक करीत आहेत.

Web Title: thousands of cattle Sales in a month in Washim taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.