हजारांवर शेतकºयांचे तुरीचे चुकारे थकित
By admin | Published: June 21, 2017 05:17 PM2017-06-21T17:17:50+5:302017-06-21T17:17:50+5:30
येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची विक्र ी करणाºया हजारांहून अधिक शेतकºयांचे चुकारे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत.
खरीप हंगाम अडचणीत: मंगरुळपीर तालुक्यातील वास्तव
मंगरुळपीर: येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची विक्र ी करणाऱ्या हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे चुकारे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
ूमंगरुळपीर तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या १ हजार २८० शेतकऱ्यांचे २१ एप्रिल २०१७ पासून ते १८ मे २०१७ पर्यंतचे चुकारे बाकी आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या खरेदीचे अर्थात नाफेडच्या ९९८ खातेदारांचे ७ कोटी ९५ लाख, तर महाराष्ट्र शासनाच्या खरेदीचे २७२ खातेदारांचे २ कोटी ३१ लाख असे १९ कोटी २६ लाख रुपयांचे चुकारे थकित आहेत. परीश्रमाने पिकविलेल्या तुरीचे चुकारे मिळाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी करावी, काही देणीघेणी करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासनाकडून या शेतकऱ्यांना दोन महिन्यापासून चुकारेच देण्यात आले नाही. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी राहिली आहेच शिवाय घरगाडा चालविण्यासाठी या शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. या कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढत असल्यामुळे हमीदराने तूर विकण्याचा काहीच फायदा या शेतकऱ्यांना झालेला नाही. शासकीय खरेदी केंद्रावर भाड्याने वाहन घेऊन तूर विक्र ीसाठी आणली. तेथे मोजणीसाठी नंबर न लागल्याने महिनाभर प्रतिक्षा करावी लागली. त्यासाठी इतर कामे सोडून आणि खाण्यापिण्याचा खर्च करून रात्री जागून काढल्या आणि तूर मोजणी झाल्यावर दोन महिन्यांपासून चुकारेच मिळाले नसल्याने सदर शेतकरी रडकुंडीस आले आहेत. येत्या दोन दिवसांत चुकारे मिळाले नाही, तर आंदोलन पुकारण्याचा इशारा चुकारे थकित असलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.