आसोला खुर्द येथे हजारोंनी भाविकांनी गाडे ओढून फेडला नवस !

By Admin | Published: April 8, 2017 09:40 PM2017-04-08T21:40:29+5:302017-04-08T21:40:29+5:30

शेकडो भाविकांनी पारंपारीक पद्धतीने सोहमनाथाचे गाडे ओढून नवस फेडला.

Thousands of pilgrims paid tribute to Asola Khurd | आसोला खुर्द येथे हजारोंनी भाविकांनी गाडे ओढून फेडला नवस !

आसोला खुर्द येथे हजारोंनी भाविकांनी गाडे ओढून फेडला नवस !

googlenewsNext

आसोला खुर्द(जि. वाशिम): येथे पुरणपोळीच्या नवसाला पावणारा देव म्हणू प्रसिद्ध असलेल्या सोहमनाथ संस्थानवर आयोजित यात्रोत्सवात शेकडो भाविकांनी ८ एप्रिल रोजी पारंपारीक पद्धतीने सोहमनाथाचे गाडे ओढून नवस फेडला. यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाच्या लाभही घेतला.
मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे ६० वर्षाहून अधिक काळापासून सोहमनाथ महाराजांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येतो . या कार्यक्रमात भागवत सप्ताहासह विविध धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल असते गुढीपाडव्यापासून सोहमनाथ येथील संस्थानवर भाविकांचे आवागमन सुरु होते. हनुमान जयंती पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला दररोज सकाळी महा आरती, अभिषेक, पुजा आदी धार्मीक कार्यकम सुरु असतात. या ठिकाणी चैत्र शुद्ध व्दादशीला सोहमनाथांच्या चरणी माथा टेकून गाडे ओढण्याचा नवस फेडण्यासाठी हजारो भाविक ७ एप्रिल रोजीच आसोला खुर्द येथे दाखल झाले होते. विधीवत पुजापाठ झाल्या नंतर ८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता पासून गाडे ओढण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सोहमनाथ संस्थापासून सुरु झालेला हा कार्यकम १ किलोमीटर अंतर पर्यंत गाडे ओढत पूर्ण करण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. भाविकांची गैरसोय होवू नये आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून गट तयार करुन प्रत्येक भाविकाला कुपन देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येकांची गाडे ओढण्याची इच्छा पुर्ण झाली. त्याशिवाय दरवर्षी प्रमाणे वस फेडण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी शेतशिवारात मुक्काम करुन पुरण पोळीचा प्रसाद तयार केला आणि घरोघरी जाऊन तो वितरीतही केला. या यात्रनिमित्त आसोला येथे आलेल्या भाविकांसाठी विविध संस्था तथा मंडळांनी मोफत चहापानाची व्यवस्थाही केली होती. आसोला येथील महंत पुरुषोत्तम गिरी महाराज भर उन्हात गाडी वर बसून रात्री १२, वाजेपर्यंत भाविकांच्या सानिध्यात राहतात हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे. मानोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार मळघने यांनी जातीने उपस्थित राहून यात्रेतील गैरप्रकारांवर आळा ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. जि.प.सदस्य रणजित जाधव यांनी स्वखर्चाने केले वहिवाट रस्त्याचे काम जेसीबी मशिनने करुन दिले. त्यामुळे यावर्षी भाविकांना जे-जा करण्यासाठी त्रास होणार नाही रस्त्यावरील खड्डे बुजवून कामपुर्ण झाल्यामुळे दुसरा मार्ग भाविकां रस्त्यावरील खड्डे बुजवून काम झाल्यामुळे दुसरा मार्ग भाविकासाठी मोकळा झाला.

Web Title: Thousands of pilgrims paid tribute to Asola Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.