मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच!
By admin | Published: July 17, 2017 02:35 AM2017-07-17T02:35:22+5:302017-07-17T02:35:22+5:30
मंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता.
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा असणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पासह, जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प सोनल, दस्तापूर, जोगलदरी, कोळंबी, चोरद, मजलापूर कासोळा, इचोरी , अंबापूर, आसेगाव प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडला नसल्याने जलप्रकल्पातील साठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, १५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे या प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.