पळसखेड येथे तीन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:31+5:302021-06-16T04:53:31+5:30
००००००० रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित वाशिम : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने अनसिंग, तोंडगाव, काटा जिल्हा परिषद गटासह ...
०००००००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने अनसिंग, तोंडगाव, काटा जिल्हा परिषद गटासह वाशिम तालुक्यातील रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगारसेवक संघटनेने पंचायत समितीकडे केली.
०००००००
डव्हा ते मेडशी रस्त्याचे काम अपूर्ण
वाशिम : डव्हा ते मेडशी पालखी रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्णच आहे. संत नगरी शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गत दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते.
००००००
शिरपूरचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १९ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले होते. शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.
०००००००
शिरपूर येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे अधूनमधून कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. १५ जून रोजीदेखील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने गावातील नागरिकांची तपासणी केली.