तिस-या दिवशीही महसूल विभागात शुकशुकाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 07:48 PM2017-10-12T19:48:28+5:302017-10-12T19:49:18+5:30

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन तिसºया दिवशी अर्थात १२ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते.

Three-day revenue division in the revenue department! | तिस-या दिवशीही महसूल विभागात शुकशुकाट !

तिस-या दिवशीही महसूल विभागात शुकशुकाट !

Next
ठळक मुद्देकर्मचा-यांचा संप सुरूच नागरिकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन तिसºया दिवशी अर्थात १२ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयांवर शुकशुकाट दिसून येतो. 
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचाºयावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने केली आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, ५ दिवसाचा आठवडा करणे, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करणे, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घेणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे महसूलविषयक कामकाज ठप्प झाले आहे. कामानिमित्त येणाºया नागरिकांना खाली हात परत जावे लागत आहे. हा संप १०० टक्के यशस्वी होत असल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी गुरूवारी केला.

Web Title: Three-day revenue division in the revenue department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.