तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:07 AM2017-08-12T02:07:52+5:302017-08-12T02:08:12+5:30
वाशिम : तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्हय़ात घडली. विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक जण विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्हय़ात घडली. विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक जण विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला.
अनसिंग: पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या २0 वर्षीय महिलेचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याची घटना सोंडा शेतशिवारात शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. सोंडा येथे सद्यस्थितीत पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतशिवारा तील विहिरीवर जावे लागते. सोंडा येथील संगीता सुभाष वाबळे ही विवाहित महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, तिचा विहिरीत अचानक तोल गेला. विहिरीत पडल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
रिसोड : विहिरीत पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १0 ऑगस्ट रोजी करडा येथे घडली. देवानंद देशमुख यांनी फिर्याद दिली की, गायीला चारापाणी करण्यासाठी तसेच झाडाला पाणी देण्याकरि ता विहिरीवर गेलेल्या उषाबाई परमेश्वर वाघ रा. अंत्री यांचा पाय घसरून विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मानोरा : दापुरा येथील भगवंत गणपत आखुड (४0) हा इसम ११ ऑगस्ट रोजी सकाळी विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला. याबाबत जगदीश भगवंत दिघडे यांनी मानोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यृची नोंद घेण्यात आली. दापुरा परिसरातील चौसाळा शेतशिवारात जगदीश भगवंत दिघडे हा शेतात फिरत असताना ११ ऑगस्टला विजेच्या टॉवरजवळ भगवंत गणपत आखूड हा इसम मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. त्यानुसार जगदीश दिघडे यांनी मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले असून, घटनेचा त पास बिट जमादार शिवा राठोड, ईश्वर बाकल, आकाश बाकुळकर हे करीत आहेत.