मानोरा तालुक्यात वेगवेगळ्या तीन घटनांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:55 PM2018-09-16T14:55:54+5:302018-09-16T14:57:06+5:30

मानोरा (वाशिम): तालुक्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांत १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Three deaths in three separate cases in Manora taluka | मानोरा तालुक्यात वेगवेगळ्या तीन घटनांत तिघांचा मृत्यू

मानोरा तालुक्यात वेगवेगळ्या तीन घटनांत तिघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमेहरून शहा अकिल शहा (३४) या महिलेने सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सेवादासनगर येथे भाग्यश्री मधुकर राठोड (१८) या तरुणीने  विष प्राशन केले होते.मोहगव्हाण येथील प्रविण प्रल्हाद पवार (२५) या युवकाने १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांत १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील गिरोली येथे मेहरून शहा अकिल शहा (३४) या महिलेने सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती ८० टक्के भाजल्या गेली. तिला यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातीलच सेवादासनगर येथे भाग्यश्री मधुकर राठोड (१८) या तरुणीने  विष प्राशन केले होते. तिच्यावर यवतमाळ येथे उपचार करण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला, तर तालुक्यातील मोहगव्हाण येथील प्रविण प्रल्हाद पवार (२५) या युवकाने १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही घटनांप्रकरणी १६ सप्टेंबरला फिर्याद दाखल झाली. यावरून मानोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहेत.

Web Title: Three deaths in three separate cases in Manora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.