दोन दिवसांत तीन शेतकर्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:24 AM2017-08-14T02:24:41+5:302017-08-14T02:25:17+5:30
रिसोड : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच पावसाने मारलेली दडी, या विवंचनेतून दोन दिवसांत रिसोड तालुक्यातील तीन अल्पभूधारक शेतकर्यांनी आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच पावसाने मारलेली दडी, या विवंचनेतून दोन दिवसांत रिसोड तालुक्यातील तीन अल्पभूधारक शेतकर्यांनी आत्महत्या केली.
१३ ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील कुर्हा येथील केशव दिनकर ठाकरे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. केशव ठाकरे यांच्याकडे पाउण एकर शेती होती, तर २0 हजार रुपयांचे सावकारी कर्ज होते. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व गत २0 ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. यातून त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी तालुक्यातील घोन्सर येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल उत्तम जाधव यांनीसुद्धा नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. अनिल जाधव यांच्याकडे दोन एकर शेती, तर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६ हजार रुपये कर्ज होते, अशी माहिती अँड. जाधव यांनी दिली. मोहजा इंगोले येथील अल्पभूधारक शेतकरी आत्माराम गणपत अडकिते (४0) यांनी १२ ऑगस्ट रोजी पायाला मोठा दगड बांधून विहिरीमध्ये उडी मारुन जीवनयात्रा संपविली. अडकिते यांच्याकडे दीड एकर शेती होती. त्यांच्यावर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २0 हजार रुपये तसेच खासगी ३0 हजार रुपये, असे एकूण ५0 हजार रुपयांचे कर्ज होते.
-