दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार; दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:14 PM2020-08-19T17:14:53+5:302020-08-19T17:15:04+5:30
घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु. (वाशिम) : दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तीन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली. धनज-भिवरी मार्गावरील अपघातात सुभाष पांडुरंग टाके (६५) रा. अमरावती व प्रताप शामलाल मोहीते (३०) रा. पिंपळगाव तर कामरगाव-लाडेगाव मार्गावरील अपघातात प्रांजळ शंकरराव गजभिये (२६) रा. लाडेगाव हे ठार झाले.
एमएच २७ क्यू ७५८६ क्रमांकाच्या दुचाकीने मृतक सुभाष टाके व अभिजित सुभाष टाके (१९) हे धनज येथून भिवरीकडे १९ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येत होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीचा व टाके यांच्या दुचाकीचा धनज-भिवरी मार्गादरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये सुभाष टाके व प्रताप मोहिते हे दोघे ठार झाले तर अभिजित टाके हा गंभीर जखमी झाला. जखमीला धनज प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान धनज पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत.
दुसºया एका घटनेत दुचाकीची बैलाला धडक लागून प्रांजळ शंकरराव गजभिये यांचा मृत्यू झाला तर अमोल वसंतराव सवाई (३०) रा. लाडेगाव हा युवक गंभीर जखमी झाला. प्रांजळ गजभिये आणि अमोल सवाई हे दोघेजण १९ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या ुसुमारास एमएच ३० क्यू ९९९२ क्रमांकाच्या दुचाकीने कामरगाव येथून लाडेगावकडे जात होते. कामरगावपासून दोन किमी अंतरावर दुचाकीची बैलाला जबर धडक लागली. या धडकेत प्रांजळ गजभिये ठार तर अमोल सवाई हा जखमी झाला. या घटनेची नोंद कामरगाव चौकितील पोलिसांनी घेतली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम व रविंद्र राजगुरे करीत आहेत.