आणखी तीन कोरोनामुक्त; दोन पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:38+5:302021-08-29T04:39:38+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. शनिवारी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७०७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
००००
९ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने दोन रुग्ण आढळून आले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. सध्या गृह विलगीकरणात एकूण ९ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
0000000000000
पाच तालुके निरंक
शनिवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. उर्वरित वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.