वाशिम जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 17:38 IST2021-08-19T17:38:30+5:302021-08-19T17:38:39+5:30
Three more corona positive in Washim district : मालेगाव व रिसोड तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरीत चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

वाशिम जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून गुरूवार, १९ आॅगस्ट रोजी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१६९६ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. गुरूवारी नव्याने ३ रुग्ण आढळून आले. मालेगाव व रिसोड तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरीत चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६९६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.