जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:08+5:302021-07-25T04:34:08+5:30

०००००००००००००००००००००००००० वार्षिक सरासरीच्या ६४.७ टक्के पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी म्हणजेच जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत ७८९.०० मिमी पाऊस ...

Three more days of rain in the district | जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम

जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम

Next

००००००००००००००००००००००००००

वार्षिक सरासरीच्या ६४.७ टक्के पावसाची नोंद

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी म्हणजेच जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असतो, तर जून ते २४ जुलैपर्यंत ३५५.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५१०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे हे प्रमाण आजवरच्या सरासरीच्या तुलनेत १४३.३ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ६४.७ टक्के आहे. ००००००००००००००००००००००००००

प्रकल्प क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात आठवडाभर पावसाने ठाण मांडल्याने प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी आणि दस्तापूर येथील लघु पाटबंधारे अंतर्गत (संग्राहक) प्रकल्पात शंभर टक्के साठा झाल्याने सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. अशात पुढे पाऊस आल्यास नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने जोगलदरी, दस्तापूर, सायखेडा, कासोळा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ००००००००००००००००००००००००००

तालुकनिहाय पावसाचे प्रमाण (मिमी)

तालुका - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस

वाशिम - ४०४.७ - ५१४.१

रिसोड - ३५०.७ - ५२५.९

मालेगाव - ३५९.७ - ५३१.२

मंगरुळ - ३१४.५ - ६०२.६

मानोरा - ३२२.५ - ५५४.०

कारंजा - ३५०.३ - ३५८.४

Web Title: Three more days of rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.