आणखी तिघांचा मृत्यू ; १८७ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:24+5:302021-03-01T04:49:24+5:30

गत १४ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, ...

Three more died; 187 corona positive | आणखी तिघांचा मृत्यू ; १८७ कोरोना पाॅझिटिव्ह

आणखी तिघांचा मृत्यू ; १८७ कोरोना पाॅझिटिव्ह

Next

गत १४ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी आणखी १८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील २३, तांदळी १, लाखी १, कासोळा १, पार्डी १, काटा ३, कोंडाळा ३, उकळीपेन २, बाळखेड २, शिरपुटी ६, सोनगव्हाण १, सोंडा १, रिसोड शहरातील २, मांगुळ झनक १, कंकरवाडी ४, येवता ३, मालेगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील ७, दहीर येथील १, चिवरा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवशक्तीनगर येथील १, इतर ठिकाणचे ३, कारंजा शहरातील तेजस कॉलनी येथील २, सराफ कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्यनगर येथील १, भारतीपुरा येथील ४, पत्रकार कॉलनी येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, चवरे लाईन येथील १, बालाजी वन परिसरातील ३, गुरुदेव नगर येथील १, गौतमनगर येथील १, जुना सरकारी दवाखाना परिसरातील २, वाणीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील २, बेलखेड येथील ४, धनज येथील ४, रहाटी येथील १, भामदेवी येथील १, मेहा येथील ७, शहा येथील १, बेंबळा येथील ४, कामठा येथील १, आखतवाडा येथील १, पीएनसी कॅम्प येथील १, कामरगाव येथील २१, ब्राह्मणवाडा येथील २, वापटी येथील २, विळेगाव येथील १, लाडेगाव येथील १, पिंप्री मोडक येथील १, टाकळी बु. येथील १, शेमलाई येथील १, धोत्रा जहांगीर येथील २, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,९३४ वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७३५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

०००

१४१९ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ८,९३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७,३५४ जणांनी कोरोनावर मात केली. तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १४१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Three more died; 187 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.