आणखी तिघांचा मृत्यू; ७५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:59+5:302021-06-11T04:27:59+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ७५ रुग्ण आढळून आले तर ११० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ५ बाधितांची नोंद झाली आहे. कारंजा तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले तर मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आले. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
७७४ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ७५ रुग्ण आढळून आले तर ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ७७४ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम तालुक्यात दोन रुग्ण आढळले
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
गुरुवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. मालेगाव शहरात दोन तर ग्रामीण भागात ९ रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात दोन तर ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळून आले.