मंगरुळपीरच्या ‘त्या’ प्रकरणात आणखी तीन डॉक्टरांचा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:22+5:302021-05-08T04:43:22+5:30

मंगरुळपीर : कोरोनाबाधित असूनही रुग्ण तपासणी केल्याने ६ मे रोजी मंगरुळपीर येथील नाथ एक्स-रे व सोनोग्राफी सेंटरच्या एकावर गुन्हा ...

Three more doctors are mentioned in Mangrulpeer's 'that' case | मंगरुळपीरच्या ‘त्या’ प्रकरणात आणखी तीन डॉक्टरांचा उल्लेख

मंगरुळपीरच्या ‘त्या’ प्रकरणात आणखी तीन डॉक्टरांचा उल्लेख

Next

मंगरुळपीर : कोरोनाबाधित असूनही रुग्ण तपासणी केल्याने ६ मे रोजी मंगरुळपीर येथील नाथ एक्स-रे व सोनोग्राफी सेंटरच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरपालिकेच्या चमूने अधिक चौकशी केली असता, या प्रकरणातील पंचनाम्यात आणखी तीन डॉक्टरांचा उल्लेख असल्याने हे प्रकरण नेमके वळण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेश संगत यांच्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल शिरसाट हा कोरोनाबाधित असताना रुग्णांची तपासणी करताना आढळून आला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १८८,२६९ नुसार गुरुवारी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पालिकेने पंचनामा केला असता शिरसाट याने पंचनाम्यात सांगितले की, तो १ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह होता. परंतु ४ मे रोजी पुन्हा चाचणी केली असता निगेटिव्ह अहवाल आला. सदर एक्स-रे सेंटर हे शहरातील तीन डॉक्टरांचे असून सिरसाट हा येथे कामाला आहे, असे पंचनाम्यात म्हटले आहे. तर सदर व्यक्ती कोरोनाबाधित असताना १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असताना व्यापार करण्याचे हेतूने व्यवसाय केला तसेच कुणालाही न सांगता कोविड केअर सेंटरमधून घरी कसा परत आला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ४ मे रोजी कोरोना चाचणी केली, असा ठपका पंचनाम्यात पालिकेने ठेवला आहे. पंचनाम्यात उल्लेख असलेले तीन डॉक्टर हे नामांकित असून, यामध्ये वाशिमच्या एका डॉक्टरचा समावेश असल्याची चर्चा आहे. पंचनाम्यात नेमक्या कोणत्या तीन डॉक्टरांचा उल्लेख आहे, हे अद्याप सांगण्यात आले नसून, याप्रकरणी ७ मे रोजी सायंकाळपर्यंत पोलिसात तक्रार झालेली नव्हती. त्यामुळे याप्रकरणात आणखी कुणावर गुन्हा दाखल होतो का? याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा आहे. कोरोनाबाधित असताना तीन दिवसातच संबंधित आरोपी आरोग्य सेवा कोणत्या आधारावर देत आहे, या अनुषंगाने चौकशी होणे आवश्यक आहे.

... ..

६० च्या जवळपास नागरिकांची केली तपासणी

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या राहुल शिरसाट याने कोरोनाबाधित असताना जवळपास ५० ते ६० पेक्षा अधिक जणांची तपासणी केल्याची चर्चा मंगरुळपीर शहरात रंगली आहे. ४ ते ६ मे दरम्यान किती जणांची तपासणी केली, याची चौकशी करणे आवश्यक ठरत आहे. तपासणी केलेल्या रुग्णांना कोरोनाविषयक काही लक्षणे आहेत का, या अनुषंगानेदेखील तपासणी होणे गरजेचे आहे.

Web Title: Three more doctors are mentioned in Mangrulpeer's 'that' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.