वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १८७ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 07:43 PM2021-02-28T19:43:52+5:302021-02-28T19:46:41+5:30
CoronaVirus News कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू तर १८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २८ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८,९३४ वर पोहोचली आहे.
गत १४ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आणखी तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी आणखी १८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील २३, तांदळी १, लाखी १, कासोळा १, पार्डी १, काटा ३, कोंडाळा ३, उकळीपेन २, बाळखेड २, शिरपुटी ६, सोनगव्हाण १, सोंडा १, रिसोड शहरातील २, मांगुळ झनक १, कंकरवाडी ४, येवता ३, मालेगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील ७, दहीर येथील १, चिवरा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवशक्ती नगर येथील १, इतर ठिकाणचे ३, कारंजा शहरातील तेजस कॉलनी येथील २, सराफ कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्य नगर येथील १, भारतीपुरा येथील ४, पत्रकार कॉलनी येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, चवरे लाईन येथील १, बालाजी वन परिसरातील ३, गुरुदेव नगर येथील १, गौतम नगर येथील १, जुना सरकारी दवाखाना परिसरातील २, वाणीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील २, बेलखेड येथील ४, धनज येथील ४, रहाटी येथील १, भामदेवी येथील १, मेहा येथील ७, शहा येथील १, बेंबळा येथील ४, कामठा येथील १, आखतवाडा येथील १, पीएनसी कॅम्प येथील १, कामरगाव येथील २१, ब्राह्मणवाडा येथील २, वापटी येथील २, विळेगाव येथील १, लाडेगाव येथील १, पिंप्री मोडक येथील १, टाकळी बु. येथील १, शेमलाई येथील १, धोत्रा जहांगीर येथील २, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,९३४ वर पोहचला असून, यापैकी आतापर्यंत १६० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७३५४ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.