वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:17 PM2021-04-08T18:17:01+5:302021-04-08T18:18:51+5:30

Corona Cases : तिघांचा मृत्यू तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

Three more killed in Washim district; 213 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; २१३ कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे२०२ जणांची कोरोनावर मात एकूण रुग्णसंख्या १८००४

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी तिघांचा मृत्यू तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १८ हजारावर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार तिघांचा मृत्यू झाला तर २१३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.  वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, अल्लाडा प्लॉट परिसरातील २, लाखाळा येथील ३, सिव्हील लाईन्स येथील १, आययुडीपी येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, गव्हाणकर नगर येथील १, लक्ष्मी नगर येथील २, मानमोठे नगर येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ७, नवीन आययुडीपी येथील २, वाल्मिकी नगर येथील १, बालाजी मंदिर जवळील १, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील १, अकोला नाका येथील २, मंत्री पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, कोल्ही येथील १, अनसिंग येथील १, शेलगाव येथील १, कृष्णा येथील १, उकळीपेन येथील ४, फाळेगाव येथील १, पार्डी टकमोर येथील २, तांदळी शेवई येथील १, सायखेडा येथील ३, पिंप्री येथील १, धुमका येथील १, रिसोड शहरातील राम नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, आसन गल्ली येथील २, नगरपरिषद परिसरातील ९, गणेश नगर येथील ६, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील १, माळी गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, सवड येथील २, घोन्सार येथील १, मोप येथील ४, बेलगाव येथील १, नंधाना येथील १, गणेशपूर येथील २, नेतान्सा येथील १, नावली येथील ६, गोवर्धन येथील १६, चिखली येथील ३, रिठद येथील २, वरखेडा येथील १, पळसखेडा येथील १, मांगवाडी येथील १, वडजी येथील १, गोभणी येथील १, मानोरा शहरातील लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरातील २, जुनी वस्ती परिसरातील १, मुंगसाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, सोमनाथ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कोंडोली येथील २, शेंदूरजना येथील १, पोहरादेवी येथील २, गव्हा येथील १, देवठाणा येथील १, वसंत नगर येथील ३, चिस्ताळा येथील १, धामणी येथील १, गिरोली येथील १, धानोरा येथील २, रुई येथील १, गादेगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील पाताळेश्वर मंदिर परिसरातील १, बाबरे ले-आऊट येथील ३, नवीन आठवडी बाजार येथील १, मंगलधाम येथील १, कल्याणी चौक येथील ४, मोझरी येथील १, दाभा येथील १, कवठळ येथील १, दस्तापूर येथील १, जोगलदरी येथील १, पोटी येथील १, मोहरी येथील २, झडगाव येथील १, धानोरा येथील १, शेलूबाजार येथील १, वनोजा येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील १, शेलू फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अमानी येथील २, चांडस येथील ५, नागरतास येथील २, गांगलवाडी येथील १, एकांबा येथील २, राजुरा येथील १, पांगरी नवघरे येथील १, चिवरा येथील १, कारंजा शहरातील संभाजी नगर येथील २, महात्मा फुले चौक येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वेदांत नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १, जनुना येथील १, जयपूर येथील १, धनज गॅस प्लँट परिसरातील १, बेंबळा येथील १, खेर्डा येथील १, कामरगाव येथील १, धोत्रा येथील १, पोहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ५ बाधिताची नोंद झाली असून २०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Three more killed in Washim district; 213 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.