डव्हा येथे आणखी तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:00+5:302021-05-07T04:44:00+5:30
००००००००००००००००००००० प्रोत्साहन अनुदानाची मागणी वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या रिसोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रोत्साहन ...
०००००००००००००००००००००
प्रोत्साहन अनुदानाची मागणी
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या रिसोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.
०००००००००००००००
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
वाशिम : राजुरा जिल्हा परिषद गटातील चार ते पाच गावातील रेशन दुकानामध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले नाही, तसेच तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही.
०००००००००००००००
बदली प्रक्रियेकडे शिक्षकांचे लक्ष
वाशिम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या केव्हा होणार, याकडे शिक्षक व शिक्षक संघटनांचे लक्ष लागून आहे.
00
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी
वाशिम : सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे अन्याय असून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासनाच्या अन्य सोयीसुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते हरीश चौधरी यांनी बुधवारी केली.
०००००००००००००
परीक्षा शुल्काची प्रतीक्षा
वाशिम : इयत्ता दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेवराव सोळंके यांनी गुरुवारी केली.