वाशिममार्गे आणखी धावणार तीन रेल्वेगाड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 06:37 PM2020-12-20T18:37:06+5:302020-12-20T18:37:17+5:30
Indian Railway News वाशिममार्गे आणखी तीन रेल्वेगाड्या धावणार आहेत.
वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात दळणवळणासाठी रेल्वे, बसेसची संख्या वाढविण्यात येत असून, वाशिममार्गे आणखी तीन रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
देशांतर्गत दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाशिम येथे फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अकोला येथील रेल्वे स्थानक गाठावे लागते. काही रेल्वे गाड्या वाशिममार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळत आहे. यापूर्वी हैदराबाद -जयपूर, जयपूर-हैदराबाद, तिरुपती-अमरावती, अमरावती ते तिरुपती या रेल्वेगाड्या सुरू आहेत. आता आणखी तीन रेल्वेगाड्या वाशिममार्गे धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. दक्षिण-मध्य रेल्वे हुजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर, श्रीगंगानगर-नांदेड, सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे सुरू केल्या. या तिन्ही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. हुजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ही २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडामार्गे रात्री ८.१५ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. श्रीगंगानगर-नांदेड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २५ डिसेंबर ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १३.२५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि हनुमानगढ, भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशिम, हिंगोलीमार्गे रात्री ९.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २४ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडामार्गे रात्री ७ वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. श्रीगंगानगर-नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २२ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी २.४५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशिम, हिंगोलीमार्गे रात्री ९.४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. सिकंदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री ९.४० वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटामार्गे जयपूर येथे सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. जयपूर-सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २६ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला