एकाच रात्री तीनठिकाणी चो-या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:16 PM2017-08-26T22:16:26+5:302017-08-26T22:18:44+5:30

कारंजा लाड तालुक्यातील कोळी येथे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

 Three at night! | एकाच रात्री तीनठिकाणी चो-या!

एकाच रात्री तीनठिकाणी चो-या!

Next
ठळक मुद्देलाखावर मुद्देमाल लंपासनागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: शहर पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील कोळी येथे दोन घरांमध्ये व कारंजा शहरात एका घरात २५ आॅगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. यात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कोळी येथील रहिवासी सीमा गणेश ढोरे व कालू हसन गारवे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून ढोरे यांच्या घरातून २ ग्रॅम सोन्याचे पेन्डॉल, ४ ग्रॅम सोन्याचे गहू मनी २ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. कालू गारवे यांच्या घराचे दार तोडून ४५ हजार रूपयाच्या नगदी रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला; तर तिसºया घटनेत सचिन अरूणराव कडू (रा.मेहा हल्ली, खान पेट्रोलपंपाच्या मागे) यांच्या भाड्याच्या खोलीतून १ सॅमसंग मोबाईल, बँकेचे एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन व रोख १० हजार ५०० रुपये असा एकूण २८ हजार ५०० रूपयांचा ऐवज घेवून चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, दाखल फिर्यादींवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३७९, व ३८० नुसार गुन्हा दाखल केला. या घटनांचा पुढील तपास ठाणेदार एम.एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विखे करित आहेत.
रिसोड येथेही चोरट्यांचा सुळसुळाट!
रिसोड शहरातील हिंगोली रस्त्यानजिकच्या साई ग्रीन पार्कमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला असून या भागात राहणाºया नागरिकांना रात्र जागू काढावी लागत आहे.
रोज रात्री चोर येत असल्याची माहिती या भागातील रहिवासी महादेव पतंगे यांनी दिली. याबाबत त्यांनी रिसोड पोलिसांना देखील माहिती दिली आहे. हे चोरटे कधी मोटारसायकलने; तर कधी चारचाकी वाहनाने येत असल्याचे दत्ता सावरकर, रवि वक्ते, धनंजय विटकरे, बोरकर, चव्हाण, प्रमोद खडसे आदिंनी सांगितले.

Web Title:  Three at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.