क्षुल्लक कारणावरून तीघांनी केला सख्या चुलत भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:55 PM2019-03-27T12:55:55+5:302019-03-27T12:56:02+5:30
रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८) या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली.
रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८) या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली.
रिसोड पोलीसांत फियार्दी सविता गजानन नरवाडे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मंगळवारी सायंकाळी स्वत:चे अंगण झाडत असतान शेजारी राहत असलेल्या आरोपींच्या घरी आणलेल्या टँकरच्या पाण्यात कचरा गेला. या कारणावरून राजू उत्तम नरवडे , नितीन उत्तम नरवाडे , समाधान उत्तम नरवाडे यांनी सविता नरवाडे यांचा पती गजानन नरवाडे याच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यामध्ये गजानन नरवाडे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वाशीम येथे उचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली . या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये राजू उत्तम नरवडे , नितीन उत्तम नरवाडे , समाधान उत्तम नरवाडे या तिघांचा समावेश आहे. या तिन्ही आरोपिंवर कलम ३०२/३४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा तपास रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. टी. खांदले , हेड कॉन्स्टेबल संजय गवई , पोलीस कांस्टेबल सतीश बांगर हे करीत आहेत.