तिन आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:37 PM2019-07-23T13:37:51+5:302019-07-23T13:38:10+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, राजा किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, राजा किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत. त्यात राजाकिन्ही, मेडशी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त, तर शिरपूरचे वैद्यकीय अधिकारी दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे नवख्या डॉक्टरांकडूनच येथील रुग्णांवर उपचारही करण्यात येत असून, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने गावागावात विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी मालेगाव तालुक्यात विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. मात्र त्यापैकी मेडशी व राजाकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक दिवसापासून वैद्यकीय अधिकाºयांचे पद रिक्त आहे. असाच प्रकार शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा आहे. येथील वैद्यकीय अधिकारी श्रीकांत करवते हे महिन्याभरापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरकलेच नाहीत. सद्यस्थितीत शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोनशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने विविध घटना जखमी होणाºया किंवा घडलेल्या गुन्ह्यात आरोपीची शारिरीक तपासण्यासाठी अधिकृत वैद्यकीय अधिकारी नसल्याने पोलीस प्रशासनालाही मोठा त्रास होत आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाचे पुरते दुर्लक्ष झाल्याने रुग्णांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी
मालेगाव तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य कें द्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांच्या बदल्या होत असताना तालुका आरोग्य अधिकारी मात्र १० वर्षांपासून येथेच ठाण मांडून आहेत. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णांची हेळसांड होत असतानाही गंभीर दखल घेण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. त्यामुळे १० वर्षांपासून मालेगाव तालुक्याचीच जबाबदारी पाहणाºया तालुका आरोग्य अधिकाºयांची बदली व्हावी, अशी मागणी गोरगरीब रुग्णांकडून होत आहे.
-मेडशी, राजाकिन्ही येथील अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे, तसेच शिरपूर येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने या प्राथमिक आरोग्य कें द्रात ‘सीएचओ’ रुग्ण तपासणी
करीत आहेत. या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरल्या जातील अशी अपेक्षा आहे.
- डॉ. संतोष बोरसे
तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव