नाफेडकडे विकता येणार हेक्टरी तीन क्विंटल उडिद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:26 PM2017-10-13T13:26:22+5:302017-10-13T13:28:18+5:30

वाशिम:  उडिद, मुगाची नोंदणी करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांसाठी एका हेक्टराला केवळ ३ क्विंटल नोंदणी करण्याची मूभा देण्यात आली आहे. 

Three quintals of arhar pulses can be sold to Nafed | नाफेडकडे विकता येणार हेक्टरी तीन क्विंटल उडिद 

नाफेडकडे विकता येणार हेक्टरी तीन क्विंटल उडिद 

Next
ठळक मुद्देप्रशासनाचा अजब कारभार शेतकºयांची प्रतिक्षा मात्र कायमच

वाशिम: नाफेडच्या खरेदीसाठी शेतकºयांना खरेदी विक्री संस्थेकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. यानुसार  उडिद, मुगाची नोंदणी करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांसाठी एका हेक्टराला केवळ ३ क्विंटल नोंदणी करण्याची मूभा देण्यात आली आहे. 

 पणन संचालकांनी शासकीय खरेदीसाठी शासनाकडे १५ दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठविला असून, याला मान्यता मिळाली नसतानाच प्रशासनाकडून संभाव्य अडचणीचा विचार करून शेतकºयांना शासकीय संस्थेकडे सातबारा, पेरेपत्रक, आधार क्र मांकासह शेतमालाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या या आवाहनानुसार शेतकरी खरेदी विक्री संस्थेकडे जाऊन उडिद, मुग या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणीही करीत आहेत; परंतु ही नोंदणी करताना शासकीय खरेदीसाठी एका हेक्टरला केवळ तीन एकर उडिद विक्रीची मूभा देण्यात आली आहे.

Web Title: Three quintals of arhar pulses can be sold to Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.