ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात तीन वाहने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:44+5:302021-05-09T04:42:44+5:30
कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उंबर्डा बाजार, मनभा, धामणी, पोहा, खेर्डा बु., या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह नागपूर-औरंगाबाद महामार्ग, अकोला, ...
कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उंबर्डा बाजार, मनभा, धामणी, पोहा, खेर्डा बु., या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह नागपूर-औरंगाबाद महामार्ग, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा लागून चारही दिशांनी कार्यक्षेत्र व्यापलेले आहे. असे असताना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निर्मितीपासूनच मिळालेल्या वाहनावर गस्तीचे कामकाज सुरू होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी या पोलीस स्टेशनला एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढली आहे. विशेष म्हणजे, सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा कार्यान्वित आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.
..........................
सोमठाणा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी
उंबर्डाबाजार : उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलीस उपनिरीक्षक आर.पी. भास्कर, पोलीस उपनिरीक्षक पटेल हे लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करीत आहेत. सोमठाणा चेकपोस्टसह उंबर्डाबाजार येथील फिक्स पाॅइंट येथे वाहनांची तपासणी चौकी जमादार कैलास गवईसह नितीन पाटील करीत आहेत.