दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:53 PM2020-12-19T12:53:37+5:302020-12-19T12:57:38+5:30

Crime News सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम रस्त्यावर १७ डिसेंबरचे रात्री १० वाजेदरम्यान घडली आहे.

The three who came from the two-wheeler snatched money from traders | दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडत्याचे सव्वा लाख रुपये हिसकावले

googlenewsNext
ठळक मुद्देचांभई गौरक्षण  ते पिंपळखुटा या रस्त्यावर अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडविले.त्यांच्या जवळील सव्वा लाख रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावली व पळून गेले.

 लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : अज्ञात तीन अनोळखी इसमांनी अडत व्यावसायिकाचे सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम रस्त्यावर १७ डिसेंबरचे रात्री १० वाजेदरम्यान घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिपंळखुटा संगम येथील प्रभुसा डगवार (वय ६४)  यांनी पोलिसांत तक्रार दिली की, १७ डिसेंबरच्या रात्री ते रामराव मैनकार यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती येथून  दुचाकीने (क्र. एमएच ३७ क्यू ०४८९) पिंपळखुटा येथे जात असताना रात्री सव्वादहा वाजताचे सुमारास चांभई गौरक्षण  ते पिंपळखुटा या रस्त्यावर अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडविले. यावेळी त्यांच्या जवळील सव्वा लाख रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावली व पळून गेले. डगवार यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. 
या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव करीत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, ठाणेदार धनंजय जगदाळे, एपीआय तुषार जाधव व कर्मचारी हे या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
 

Web Title: The three who came from the two-wheeler snatched money from traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.