‘थीनर’ प्यायल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 04:27 PM2019-03-24T16:27:00+5:302019-03-24T16:34:00+5:30
रंगरंगोटीच्या कामात वापरले जाणारे ‘थीनर’ प्यायल्याने एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना 23 मार्च रोजी घडली.
मंगरूळपीर (वाशिम) - रंगरंगोटीच्या कामात वापरले जाणारे ‘थीनर’ प्राशन केल्याने एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना 23 मार्च रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथे वास्तव्यास असलेली समीरा जावेद शेख (3) या मुलीने रंगरंगोटीचे काम सुरू असताना त्यात वापरल्या जाणारे ‘थीनर’ प्यायले. यामुळे समीराची प्रकृती खराब झाली. अत्यवस्थ अवस्थेत तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी तिची अकोला येथे रवानगी करण्यात आली. मात्र, अकोला पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून मंगरूळपीर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीरा शेख हिला 23 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करून अकोला येथील रुग्णालयाकडे ‘रेफर’ करण्यात आले.
- डॉ. रश्मी राऊत, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर