वाशिमचे तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर

By admin | Published: June 18, 2017 01:52 AM2017-06-18T01:52:01+5:302017-06-18T01:52:01+5:30

धाडसी उपक्रम; सायकलने ४.५ हजार किमी प्रवास!

On the threshold of making history of Washim | वाशिमचे तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर

वाशिमचे तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील वाशिम सायकलस्वार ग्रुपचे गौरांग नाईक व अभिषेक व्यवहारे हे २२ वर्षीय तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. सायकलने भारतभ्रमण करीत ४ हजार ६00 किलोमीटर अंतर पार करण्याचे ध्येय उराशी बाळगून या मोहिमेला त्यांनी १ जून २0१७ रोजी सुरुवात केली असून, सद्यस्थितीत त्यांनी १ हजार ८00 किलोमीटर अं तराचा टप्पा पारही केला आहे.
वाशिम सायकलस्वार ग्रुपचे गौरांग नाईक व अभिषेक व्यवहारे यांनी अवघ्या ३0 दिवसांत ४६00 किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या मोहिमेंतर्गत हे दोघे १ जून रोजी कन्याकुमारीहून लेहकडे जाण्यासाठी सायकलवरून निघाले. हे दोघेही यंदा नुकत्याच सुरु झालेल्या पावसाचा सामना करीत १८00 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून १४ जून रोजी नागपुरात दाखल झाले आहेत. ह्यसायकल टू वर्कह्ण हा संदेश घेऊन ते सायकलवर भारतभ्रमण करीत आहेत. त्यांनी आपल्या मोहिमेला ह्यके टू केह्ण (कन्याकुमारी ते खारदुंग पास) असे नाव दिले आहे. ते ज्या-ज्या शहरातून गेलेत तेथील सायकलप्रेमी मंडळींनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. काही मंडळीनी त्यांना आर्थिक मदतसुद्धा केली. अकोल्याचे डॉ.राजेंद्र सोनोने यांनी त्यांच्या साहसिक सायकल सफरीची कहाणी फेसबुकवर वाचून त्यांना ५ हजार रुपयांची मदत केली आहे. हे दोघे आता १६ जून रोजी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नंतर जगातील सर्वात उंच अशा मार्गावर खारदूंग पास येथे आपला ४६00 किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण करून एक नवा इतिहास रचणार आहेत.

Web Title: On the threshold of making history of Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.