वर्षभरापासून विद्यार्थी घेत आहेत जल साक्षरतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 05:32 PM2019-08-10T17:32:46+5:302019-08-10T17:33:09+5:30
जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत.
तºहाळा जि.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व कळावे, भावीकाळात त्यांच्याकडून जलसंधारणासाठी प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्षभरापासून विद्यार्थ्यांना जल साक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत.
सतत कमी होत असलेले पर्जन्यमान, पर्यावरणाचा ºहास आणि त्यामुळे मानवी जिवनावर होत असलेल्या परिणामाची जाण आता सर्वांनाच होऊ लागली आहे. त्यासाठी शासन, प्रशासनासह सामाजिक संस्थांच्यावतीने जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात जलसंधारणाची बिजे रुजली जावित म्हणून शासनाची व्यापक मोहिम सुरू असून, याच माध्यमातून प्रत्येक गाव जल साक्षर करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयांतही जल साक्षरतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, या शाळेत गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यात पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन, जलसंधारण, जलसंवर्धन कसे करायचे आदिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जलदूत रविंद्र इंगोले यांचे सहकार्य लाभत आहे. शाळेतील शिक्षक बंडू गावंडे, मिलिंद भगत, प्रदीप गावंडे अरूण तळेकर, शिक्षिका सुप्रिया कटके, प्रतिभा देशमुख, अर्पणा जिरापुरे आदि मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.