एसटीच्या तिकिट मशीन ठरताहेत डोकेदुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 03:41 PM2019-08-13T15:41:17+5:302019-08-13T15:42:12+5:30

मशीनमध्ये वारंवार बिघाड होण्यासोबतच या मशीन लवकरच डिश्चार्ज होत आहेत.

ticket machine of ST becoming a headache | एसटीच्या तिकिट मशीन ठरताहेत डोकेदुखी 

एसटीच्या तिकिट मशीन ठरताहेत डोकेदुखी 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील चारही आगारांत वाहकांसाठी उपलब्ध केलेल्या तिकिट मशीन डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. मशीनमध्ये वारंवार बिघाड होण्यासोबतच या मशीन लवकरच डिश्चार्ज होत आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणी येत आहेत. दरम्यान, अशा परिस्थिती पूर्वीच्या पद्धतीनुसार ट्रे वापरण्याबाबतही उदासीनता असल्याने बसफेºयांना विलंब होऊन प्रवाशांचे मात्र नाहक हाल होत आहेत.  
एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या तिकीट मशीनमध्ये बिघाड झालेला असतानाही आणि त्यांची कालमर्यादा संपली असतानाही त्या वापरण्याची सक्‍ती वाहकांना करण्यात येत आहे.  एसटी महामंडळाच्या तब्बल १९ हजार बसेसच्या माध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधींचा महसूल मिळत आहे. त्यामुळेच हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाने आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ४५ हजार मशीन्स खरेदी केल्या आहेत. संबंधित कंपनीच्या सुचनेनुसार या मशीन्सची वयोमर्यादा पाच वर्षे आहे. मात्र, या मशीन्सची खरेदी करून आठ वर्षांहूनही अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे या मशीन्स बदलण्याची आवश्‍यकता होती. त्यासंदर्भात अनेक वाहकांनी प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत.  या मशीन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकिट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले आहेत. तिकिट मशीनमधील बिघाड अथवा चार्जिंग उतरल्यानंतर वाहक गाडी पुढे नेत नाहीत. अनेकदा, तर आगारात चार्जिंग झालेल्या मशीनच उपलब्ध नसल्याने बस तासनतास उभी ठेवली जाते. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मंगरुळपीर आगारात मंगळवारी लांब पल्ल्यांच्या दोन बसफेºयांच्या वाहकांनाही चार्जिंग झालेली मशीन मिळत नसल्याने या फेºयांना विलंब झाला.

ट्रे वापराबाबत उदासीनता
एसटी महामंडळाने वाहकांना तिकिटासाठी उपलब्ध करून दिलेल्या मशीन वारंवार बिघडत आहेत. त्याची चार्जिंग उतरत आहे. त्यामुळे वाहकांना अडचणी येत आहेतच शिवाय बसफेºया खोळंबत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात वाहकांनी पूर्वीच्या ट्रे पद्धतीचा आधार हाताशी ठेवणे आवश्यक आहे. तसी सोयही आगारात करून ठेवलेली आहे; परंतु ट्रे वापराबाबत फारसा उत्साह दिसत नाही. यामुळे एक, तर वाहकांना नव्या मशीन उपलब्ध करणे किंवा त्यांना ट्रे सोबत ठेवण्याची सक्ती करण्याबाबत एसटी प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवासीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

Web Title: ticket machine of ST becoming a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.