जिल्ह्यात विजेची १० कोटी रुपये थकबाकी
By admin | Published: July 4, 2017 02:23 AM2017-07-04T02:23:57+5:302017-07-04T02:23:57+5:30
वाशिम : जिल्ह्यात घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जूनअखेर १० कोटी रुपये थकबाकी असून, ती वसूल होणे कठीण झाल्यामुळे महावितरण हैराण झाले आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जूनअखेर १० कोटी रुपये थकबाकी असून, ती वसूल होणे कठीण झाल्यामुळे महावितरण हैराण झाले आहे.
जिल्ह्यात वीज वितरणचे २ लाख १९ हजार ग्राहक आहेत. माहेवारी वसूल होणाऱ्या देयकातून ७० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च केली जाते; उर्वरित ३० टक्के रकमेतून प्रशासकीय खर्चासह इतर खर्च भागवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांनी थकबाकी अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.