खासगी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:26+5:302021-05-20T04:44:26+5:30
जिल्ह्यातील इतर गावांसह अनसिंग परिसरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू ...
जिल्ह्यातील इतर गावांसह अनसिंग परिसरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह मालवाहतूक करणारी वाहनेही जागीच धूळ खात उभी आहेत. फर्निचर, हार्डवेअर, मार्बलच्या दुकानांवर माल वाहतूकदारांचा व्यवसाय अवलंबून आहे. ही दुकानेच बंद असल्याने बेरोजगार होण्याची वेळ वाहनधारकांवर आलेली आहे. उन्हाळ्यात सुरू राहणाऱ्या लग्नसराईतही मालवाहतूक केली जात असल्याने संबंधितांना बऱ्यापैकी मिळकत होते. त्यातून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासह घरखर्च भागविण्यात येतो; मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून व्यवसाय बंद असल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.