टमरेल जप्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 07:51 PM2017-10-09T19:51:59+5:302017-10-09T19:52:41+5:30

वाशिम : जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी उघड्यावर जाणाºयांना पोलिस चौकीत आणून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही बाब स्वच्छता राखण्यात बहुतांशी फलदायी ठरत असली तरी अनेक गावांमध्ये उघडयावर शौचास जाणाºयांचे प्रमाण दिसून येत आहे. यासाठी आता मालेगावच्या पथकाने गावोगावी जावून टमरेल जप्ती अभियान हाती घेतले आहे. ७ आॅक्टोंबर रोजी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे प्रत्येक घरात जावून टमरेल शोधून जप्ती करण्यात आलेत.

Timer seizure campaign | टमरेल जप्ती अभियान

टमरेल जप्ती अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देचिवरा येथून सुरुवात प्रत्येक घराची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी उघड्यावर जाणाºयांना पोलिस चौकीत आणून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही बाब स्वच्छता राखण्यात बहुतांशी फलदायी ठरत असली तरी अनेक गावांमध्ये उघडयावर शौचास जाणाºयांचे प्रमाण दिसून येत आहे. यासाठी आता मालेगावच्या पथकाने गावोगावी जावून टमरेल जप्ती अभियान हाती घेतले आहे. ७ आॅक्टोंबर रोजी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे प्रत्येक घरात जावून टमरेल शोधून जप्ती करण्यात आलेत.
हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, परंतु काही गावांमध्ये पथकांसोबत वाद घातल्या जात आहे. असा काहीसा प्रकार काही दिवसाआधी मेडशी येथे घडल्याने वाद घालणाºयाविरुध्द पोलीसांत गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला आहे. गुडमॉर्निंग पथकाला सहकार्य करुन स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्याचे आवाहन स्वच्छता अभियान पथकाच्यावतिने करण्यात येत आहे. टमरेल जप्ती अभियानामध्ये मालेगावचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर ,पुष्पलता अफुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक कैलास आदमने, चंदू पढघान, सरपंच उंडाळ, उपसरपच, ग्रा.पं. सदस, पं.स.चे दत्ता चव्हान, सुखदेव पढघान, बाळू ईगोंले, अभय तायडे ईत्यादीचां सहभाग होता

Web Title: Timer seizure campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.